प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबूटिंबूची भाषा करत आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३१ डिसेंबर २०२२


हिवाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असताना त्यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदललं.

ज्या प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांना कायम विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबांची भाषा करायला लागले? मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो आधी काय काय आहे ते बघा म्हटलं. आम्हाला पाटीभर लिंबं सापडली तिकडे. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली.

आम्ही रेशीमबागेत गेलो त्यावरही टीका झाली. आम्हाला रेशमाचा किडा वगैरे संबोधलं गेलं. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो आहोत. आम्हाला बोलणाऱ्यांनी एवढं लक्षात ठेवावं आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. आम्हाला आव्हान देण्यात आलं की हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा. जे काहीही न करता घरात बसून राहतात ते आम्हला शिकवत आहेत ही बाब आश्चर्याचीच आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *