अजित पवार म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व – गुलाबराव पाटील

३० डिसेंबर २०२२


गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलंय. अजितदादा पवार म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. त्यांचा एक गुण साऱ्यांनाच आवडतो. त्यांचा या गुणाचं सभागृहातही कौतुक होतं, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.

अजित पवार हा नेता पैलू आहे. चुकलं तर अजितदादा तोंडावर बोलतात. म्हणून ते सभागृहात सगळ्यांना आवडतात, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे. अजित पवार सत्तेत असो किंवा विरोधीपक्षात तरी ते नेहमी योग्य गोष्टींच्या पाठिशी उभे राहतात. महाविकास आघाडीमध्ये अजितदादांना विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षाचा आपल्या नेत्यावर विश्वास नाही, असं दिसतंय. उद्या सभागृहामध्ये काही चढाओढ झाली तर त्यांनाच विचारता अंधेरी रात में कार्यक्रम सुरू होईल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

उत्तर महाराष्ट्र विदर्भ असेल सिंचन प्रकल्प असेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५००० मदत मिळेल. विदर्भा ज्या करता लागणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कामकाजाकडे लक्ष टाकलं तर शंभर लक्षवेधी नऊ दिवसात होतात. प्रश्न उत्तराचा तास रेगुलर होतोय. त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *