श्री खंडोबा यात्रेमुळे आकुर्डीतील वाहतुकीत बदल

दि. २८/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : आकुर्डीतील श्री खंडोबाची यात्रा असल्याने बुधवार आणि गुरुवारी आकुर्डीतील खंडोबामाळ चौकातील वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे खंडोबा मंदिर आहे. येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन दिवसात लाखाे भाविक येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  वाहतुकीत बदल केला आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे..

▪थरमॅक्‍स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर.डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर, चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
▪परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर.डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
▪चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चोकाकडून थरमॅक्‍स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.
▪टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्‍स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *