काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, यांना मराठी म्हणावे की नाही?; आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका

२६ डिसेंबर २०२२


मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता, असा आरोपा भाजपाने केलेला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे नामोल्लेख न करता ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात. उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात? त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये.? काळजात ज्यांच्या “मराठीपणाची” काळजीच उरली नाही. मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही?” असं शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *