संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट; सीमावादावरून बोम्मईंनी राऊतांना ठरवले देशद्रोही

२३ डिसेंबर २०२२


कर्नाटक सीमेची एक इंच जागाही महाराष्ट्राला देणार नाही असं बसवराज बोम्मई म्हटले होते. यावर बोलताना राऊत यांनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला होता. केंद्रात भाजपचे सरकार आहे. चीनला एक इंचही जागा देणार नाही, असे भाजप सरकार सांगत असते. चीनने घुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे आम्हीही कर्नाटकात घुसखोरी करु. घुसखोरी करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र आम्ही मानतो की हा देश एक आहे. हा वाद चर्चेने मिटू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक याप्रकरणात भडकवण्याचे काम करत आहेत. असे राऊत म्हणाले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाच बसवराज बोम्मई यांनी खासदार संजय राऊत यांना थेट देशद्रोही करून टाकले आहे. त्याचबरोबर संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बोम्मई म्हणाले की, संजय राऊत हे देशद्रोही आहेत, संजय राऊत हे चीनचे दलाल आहेत. राऊत हे चीनच्या बाजूने आहेत. ते देशाची एकात्मता व अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जर अशीच वक्तव्य करत राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *