कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका ‘अलर्ट मोडवर’

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका ‘अलर्ट मोडवर’ आली आहे. राज्यशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची रुग्णांची कोविड चाचणी केली जाणार आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. नव्या व्हेरियंटचे रुग्ण देशामध्ये सापडले आहेत. हा व्हेरियंट अधिक घातक असल्याची शंका शास्त्रज्ञांना आहे. त्यामुळे भारत सरकारने सावधगिरीसए पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याला अनुसरून महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एका भाग म्हणून शहरातील सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी केली जाणार आहे.

कोरोना तपासणीमध्येही वाढ करण्यात येणार आहे. शहरातील वायसीएम, जिजामाता, थेरगाव, भोसरी व आकुर्डी रुग्णालय तयार ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच चारही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वहन यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. व्हेटिलेटर, तसेच इतर यंत्रणा चालू आहेत. रुग्णांसाठी लागणारा औषधांचा साठा वैद्यकीय विभागाकडे आहे अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

नव्या व्हेरियंटला नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी, तसेच मास्क, सॅनिटायजर, तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *