फिफा विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समध्ये गोंधळ, चाहत्यांनी जाळली वाहने

१९ डिसेंबर २०२२


अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने ४-२ असा विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समधील चाहत्यांचा संयम सुटला असून देशाच्या विविध भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *