वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे; विजेतेपद मिळवल्यानंतर मेस्सीने केली मोठी घोषणा

१९ डिसेंबर २०२२


जगातिक फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा स्टार आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने अखेर ३६ वर्षानंतर देशवासियांचे स्वप्न साकारले.कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या विजयानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने एक मोठी घोषणा केली

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने अखेर रविवारी रात्री त्याचे स्वप्न पूर्ण केले, ज्याची तो अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. त्याच्या ट्रॉफी संग्रहात जगातील सर्व विजेतेपदे होती ज्याची प्रत्येक फुटबॉलपटूची आकांक्षा असते परंतु त्याच्याकडे विश्वचषक पदकाची कमतरता होती आणि आता मेस्सीने कर्णधार म्हणून आपल्या देशाला तिसरा विश्वचषक जिंकून ही इच्छा पूर्ण केली आहे. यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता की अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा शेवटचा सामना आहे का? यावर खुद्द मेस्सीने मोठे वक्तव्य केले आहे.

फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने विजेतेपदावर कब्जा केला. अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने हे विजेतेपद तर पटकावलेच शिवाय गोल्डन बॉलचा पुरस्कारही जिंकला.

अर्जेंटिनासाठी फुटबॉल खेळणे थांबवणार नसल्याचे मेस्सीने सामन्यानंतर स्पष्ट केले. मेस्सीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे. राष्ट्रीय संघात राहून मी जे करत आहे ते करण्यात मला आनंद आहे. मेस्सीच्या या वाक्याने जगभरातील त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *