पालिकेच्या २०४ बालवाड्यांत देणार सकस पोषण आहार

१९ डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या शिक्षण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या २०४ बालवाड्यांमध्ये सकस पोषण आहार ( कोरडा शिधा ) देण्यात येणार आहे. बालवाड्यांतील एकूण ७ हजार ७०० विद्यार्थ्यांना हा आहार दिला जाणार आहे . या कामासाठी आधीच्या निविदेची मुदत संपल्याने नव्याने ई – निविदा काढण्यात आली आहे. पुढील दोन वर्ष कालावधीसाठी म्हणजे एप्रिल २०२५ पर्यंत या कामासाठी नवीन मुदत निश्चित केली आहे.

निविदा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बालकांना पोषण आहार मिळू शकणार आहे . त्यामध्ये प्रति विद्यार्थी ४ खजूर , २ शेंगदाणा लाडू , २ डिंक लाडू , १ नाचणी बिस्कीटचा छोटा पुडा ( ५० ग्रॅम ) , १ पारले बिस्कीटचा छोटा पुडा ( ५० ग्रॅम ) , २ राजगिरा लाडू असा आहार दिला जाणार आहे . आठवड्यात प्रत्येक दिवशी कोणता आहार द्यायचा , याचे नियोजन करण्यात आले आहे . या कामासाठी अंदाजे ३ कोटी १३ लाख ९ १ हजार रुपये इतका खर्च निश्चित करण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *