सायबर विभाग अधिक सक्षम करणार – पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

१५ डिसेंबर २०२२

पिंपरी


सायबर गुन्हे वाढत असून त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, तांत्रिक साहित्याची उपलब्धता करून सायबर गुन्हेगारीला आळा घातला जाईल, असा विश्वास शहराचे नवीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी व्यक्त केला.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (ता.१४) मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. मंगळवारी भारतीय पोलिस सेवेतील राज्यातील तीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाली. तर त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सायबर गुन्हे वाढत असून त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांना यामधील ज्ञान आहे, त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. गतीने तपास केला जाईल. तसेच स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची मागणी केली आहे. त्याचाही पाठपुरावा करणार आहे. सायबर विभाग अधिक सक्षम करण्यावर भर राहणार आहे. सायबर गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पोलीस स्टेशन अथवा सायबर विभागाकडून तपास करण्याबाबत नियोजन केले जाईल, असे आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *