सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडल्याने महापालिकेला ३२५ कोटींचा भुर्दंड

१५ डिसेंबर २०२२

पुणे


चालू आर्थिक वर्षात महापालिकेला सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडल्याने तब्बल ३२४.८७ कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून वाढविण्यात आलेल्या जलदरांमुळे मूळ पाणीपट्टीही वाढली आहे. महापालिका मंजूर पाणीकोट्यापेक्षा जास्त पाणी वापरते. या पार्श्वभूमीवर वाढलेली पाणीपट्टी, मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी वापरणे आणि सांडपाणी थेट नदीत सोडणे याचा एकत्रित महापालिकेला ६४९.७४ कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

जलसंपदा विभागाकडून राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना प्रति हजार लिटरला ६.२० ते १२.४० रुपये आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रति हजार लिटरला ४५ ते ९० रुपये वाढ करण्यात आली आहे.

नवे दर १ जुलैपासून सुरू झालेल्या जलवर्षापासून लागू करण्यात आले आहेत. या दरात सन २०२३-२४ मध्ये दहा टक्के, तर सन २०२४-२५ या जलवर्षासाठी २० टक्के वाढ होणार आहे. तसेच मंजूर पाणी कोट्यापेक्षा १०० ते १२५ टक्के जादा पाणीवापर केल्यास महापालिकांना अनुज्ञेय दराच्या दीडपट १२५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीवापर केल्यास सरासरी दराच्या तिप्पट दर आकारण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *