धनुष्यबाणासाठी ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात

१४ डिसेंबर २०२२


एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या पक्षनावावर आणि धनुष्यबाण या निशाणीवर दावा केला होता. मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते.

दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन आणि पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली होती. याआधी सिंगल बेंचनं ठाकरे गटाची याचिका फेटाळली होती.

धनुष्यबाणासाठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट याचिका दाखल करणार आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढं पुन्हा अपील करणार आहेत.