पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२ अधिकाऱ्यांकडून खुलासा सादर

१३ डिसेंबर २०२२

पिंपरी


स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणाऱ्या १२ अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे.

पर्यावरण स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, सामन्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्यासह भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांना नोटीस बजावण्यात आली होती.

स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती कार्यशाळेचे २९ नोव्हेंबरला चिंचवडच्या ऑटो क्लस्टर हॉलमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेला सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. मात्र, अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी त्या १२ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर सर्व अधिकाऱ्यांनी खुलासे सादर केले आहे. त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *