पुण्यातून कर्नाटकला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

०८ डिसेंबर २०२२

पुणे


एसटीच्या पुणे विभागातून कर्नाटकला जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला काही प्रमाणात ब्रेक लागला असून, एसटीच्या गाड्या बेळगाव जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र, बेळगाव वगळता तेथील इतर भागात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सीमावाद पेटला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या गाड्यांना पुण्यात काळे फासण्यात आले, तर महाराष्ट्राच्या गाड्यांवर बेळगावात हल्ले करण्यात आले. यामुळे येथील स्थिती तणावाची झाली असून, महाराष्ट्राच्या सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या वादामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *