मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

०७ डिसेंबर २०२२


भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर नाव कोरलं. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील मीराबाईचे हे दुसरं पदक आहे. यापूर्वी 2017 मध्ये मीराबाईनं सुवर्णपदक जिंकलं होतं.

२८ वर्षीय मीराबाई चानूनं एकूण २०० किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं आहे. तर हौ झिहुआने एकूण १९८ किलो वजन उचललं. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूसाठी हे पदक मिळवणं तसं सोपं नव्हतं. मीराबाईनं सुरुवातीच्या स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचललं. दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचललं. यानंतरच्या प्रयत्नात मात्र मीराबाई चानूनं ११३ किलो वजन उचललं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *