पालिकेकडून प्राणिसंग्रहालयातील सापांच्या खाद्यासाठी उंदराचा खर्च तब्बल १२ लाख

३० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर, चिंचवड येथील संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयास गेल्या सात वर्षांपासून टाळे आहे. असे असतानाही तेथील सापांसाठी खाद्य म्हणून पांढरे उंदिर दिले जातात. या मेजवानीचा खर्च तब्बल १२ लाख इतका आहे. महापालिकेचे शहरातील एकमेव असलेल्या प्राणिसंग्रहालयाचे सुशोभीकरण व नूतनीकरणासाठी गेल्या सात वर्षांपासून काम सुरू आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालय बंद आहे.

प्राणिसंग्रहालय बंद असले तरी, तेथील सर्प, मगर, कासव व पक्षी अद्याप तेथेच पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहेत. त्यांना दररोज खाद्य म्हणून भाजीपाला, फळे, मांस उंदीर असे पदार्थ दिले जातात. सापांना दररोज पांढरे उंदीर खाद्य म्हणून दिले जातात. उंदरे पुरविण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने १६५ रूपये दराने निविदा काढली होती. त्यासाठी ३ निविदा प्राप्त झाल्या. त्यात सॅम एंटरप्रायजेसची दोन रूपये कमी दराची १६३ रूपयांची निविदा पात्र ठरली. दोन वर्षांसाठी उंदराचा खर्च ११ लाख ७३ हजार ६०० रुपये इतका आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *