पाणी न सोडल्याने वारकरी तसेच परिसरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल

२१ नोव्हेंबर २०२२

चिखली


कार्तिक वारीसाठी देहू – आळंदी परिसरात राज्यभरातून वारकरी आले आहेत . या तीर्थक्षेत्राच्या मध्ये असलेल्या चिखली परिसरातील नागरिक या वारकऱ्यांसाठी फराळ तसेच अन्नदान करतात . कार्तिक वारीतील वारकऱ्यांची वर्दळ असेपर्यंत अधिक प्रमाणात पिण्याचे पाणी सोडावे , यासाठी महापालिकेला विनंती करूनही पाणी न सोडल्याने वारकरी तसेच परिसरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी केली आहे . कार्तिक वारीनिमित्त राज्यभरातून वारकरी आळंदी परिसरात दाखल झाले आहेत . आळंदी येथे आलेले हजारो वारकरी चिखलीमार्गे देहू येथे दर्शनासाठी जातात . तसेच चिखलीतील टाळ मंदिराला भेट देतात.

चिखलीतील नागरिक या वारकऱ्यांचे स्वागत करतात . दरवर्षीप्रमाणे चिखली परिसरातील काही नागरिकांनी प्रदान क या वारकऱ्यांसाठी अन्नदान फराळ तसेच मुक्कामी राहण्याची सोय केली आहे . वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये , यासाठी वारकऱ्यांची वर्दळ असेपर्यंत दोन दिवस अधिक पाणी सोडावे , अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आली होती मात्र पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष करून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली . त्यामुळे वारकऱ्यांची पाण्याअभावी हाल झाल्याची तक्रार विकास साने यांनी केली आहे . याबाबत वारकरी रामकिसन फुंदे म्हणाले , ” चिखलीतील अनेक नागरिक वारकऱ्यांची सोय करतात मात्र पाणी नसल्याने त्यांना टँकरद्वारे पाणी आणून वारकऱ्यांची सोय करावी लागली आहे . याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *