२१ नोव्हेंबर २०२२
देहू
आळंदीत कार्तिकी यात्रेनिमित्त हजारो भाविक रविवारी माउलींच्या दर्शनासाठी दाखल झाले . त्यानंतर देहूत संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. देहूत चोख पोलिस बंदोबस्त ,वाहनांचे पार्किंग शहराबाहेर केल्याने गावात वाहतूक सुरळीत होती. कार्तिकी वारीनिमित्त देहू येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती संस्थानच्यावतीने श्री संत तुकाराम महाराज मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती . पहाटेपासून भाविकांची लांबच लांब रांग लागली होती . संस्थानच्यावतीने पहाटे महापूजा झाली . दर्शनबारीतून भाविकांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात येत होता . मंदिराच्या महाद्वाराजवळ बसविलेल्या एलएडी स्क्रीनवर पांडुरंग रुक्मिणी माता व श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाची सोय होती . येथे बाहेरूनच काही भाविक हात जोडून दर्शन घेत होते कार्तिकी यात्रेनिमित्त देहूत एक सहायक पोलिस आयुक्त , २ पोलिस निरीक्षक , १४ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक , पोलिस अंमलदार ८१ असा बंदोबस्त होता.