आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राचं पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही – अंबादास दानवे

२१ नोव्हेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे .उद्धव ठाकरे गटदेखील आक्रमक झाला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

शिवसेना राज्यभरात आंदोलन करत आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. शिवाजी महाराज आज तसेच येणाऱ्या काळातही सर्वांचेच आदर्श असतील. ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी विधाने करत आहेत. कोश्यारी दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्ये करतात का? ते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही, असा थेट इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शिवसेनाला कोणीही शिकवण्याची गरज नाही. आम्ही लाखो सह्यांचं निवेदन याधीच राष्ट्रपतींना दिलेलं आहे. या पत्रात आम्ही सावरकरांना भारतत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही लोक गळा काढत होते. मात्र काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्यानंतर ते रस्त्यावर उतरले नाहीत. म्हणजेच त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे,” अशी टीका दानवे यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *