राज्यपाल असो किंवा त्रिवेदी या दोघांनीही माफी मागायला हवी – उदयनराजे भोसले

२१ नोव्हेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अनादर आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची केलेली बदनामी यामुळे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले आहेत. उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यापालाच पद सन्मानाच पद आहे. त्यांना आपण काय बोलावं हे कळायला पाहिजे. त्यांनी एकदा नव्हे दोनदा विधान केलं, याकडे उदनराजे यांनी लक्ष वेधलं. सुधांशु त्रिवेदी यांच्यावर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कुठला तो थर्डक्लास भिकारडा. अशा लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलायचं? राज्यपाल असो किंवा त्रिवेदी या दोघांनीही माफी मागायला हवी. सर्वात आधी त्यांना पदावरून हाकला. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल हे मी त्यावेळी सांगेल, असा इशारा त्यांनी दिला. ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणं गरजेच आहे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर आपण शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी आणि राज्यपालांना फेकून दिलं पाहिजे, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

ज्यांनी आपलं सर्व आयुष्य समाजासाठी अर्पित केलं, त्या माणसाबद्दल बोलताना लायकी नसणाऱ्यांनी शिंतोडे उडवू नये. जनतेने अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे. मग कुणीही असो, असंही ते म्हणाले. त्रिवेदीला चप्पलेने मारलं पाहिजे. त्रिवेदी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी चोपून काढा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.काय पण बोलायच, कुणाबद्दल पण बोलायच त्याला भाजपाचा पाठिंबा नाही. हे राजकारण होतंय. पाठबळ कुणी देत नाही. राज्यपालला इथे नाही, कुठे ही ठेवू नका. वय झालं, विस्मरण होतयं. काय बोलतोय ते त्यांना कळत नाही. घरी जावू द्या, नाहीतर वृध्दाश्रमात जावू द्या. त्रिवेदीला पहिलं बाहेर काढा. नाहीतर मी माझ्या पद्धतीने बघेल, असा इशाराही त्यांनी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *