पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक

१८ नोव्हेंबर २०२२

पुणे


पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना कर्जत जवळ शेलू वांगली परिसरात घडली आहे. यात एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागून तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रेल्वे स्थानकावर प्रथम उपचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.

रेल्वे धावत असताना ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे. मात्र या घटना अद्यापपर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीत. यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. रेल्वे स्थानकावर जखमी प्रवाशावर प्रथमोचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. या टोळीने रेल्वेवर दगडफेक का केली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *