मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, ठाकरे गटाने गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण

१७ नोव्हेंबर २०२२


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन स्मृती दिनानिमीत्त दर्शन घेतले.दरम्यान यावरून चांगलच राजकारण तापलं आहे

मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जाताच काही वेळानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथं गोमूत्र शिंपडलं आहे.गद्दारांमुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे अपवित्र झाले आणि म्हणून तिथे गोमूत्र शिंपडून आम्ही ते पवित्र केले, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *