भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पहिल्यांदाच भेट

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


पंतप्रधान नरेंद्र मोदी जी20 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी तीन दिवसीय इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मंगळवारी (दि.१५) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांची वर्णी लागल्यानंतर भारतात त्यांची बरीच चर्चा झाली होती. G20 शिखर परिषदेत या दोन्ही जागतीक नेत्यांमध्ये काही काळ चर्चाही झाली. पंतप्रधान कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. ऋषी सुनक यांनीही मोदींच्या भेटीचा फोटो त्यांच्या अकाउंटवर शेअर केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये समोरासमोर झालेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात या दोघांची फोनवरुन चर्चा झाली होती. यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर त्यांच्यात संवाद झाला होता.

पंतप्रधान मोदी सोमवारी बाली येथे पोहोचले. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या बायडेन यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांचीही भेट झाली. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी परिषदेतील (G20 Summit) अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सत्रात संबोधित केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *