दुप्पट पैसे परत देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दुप्पट पैसे परत देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जुनी सांगवी येथे घडला. याप्रकरणी प्रशांत भिकाजी साळुंके (रा. लेन क्रमांक ३, जयमालानगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला व त्यानंतर फिर्यादीला व्हाट्सअप कॉल केला. त्यांना दुप्पट पैसे परत देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फोन पे वरून वेळोवेळी फिर्यादीकडून तीन लाख रुपये घेतले. मात्र, नंतर पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *