भारत जोडो यात्रेचा आज राज्यात चौथा दिवस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


राज्यात तिसऱ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत असताना बुधवारी राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन बातचीत केलीय. दरम्यान या सर्व यात्रेत कुटुंबासह सामील झालेले कोळी बांधवांचे कुटुंब लक्ष वेधून घेत होते. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेले कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगतल्या. दरम्यान, आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहे.  आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलुर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *