कर थकविणाऱ्यांनो सावधान, घरातील टीव्ही, फ्रीज यासह वाहने पालिका जप्त करणार

०९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


ज्या निवासी मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे , त्यांच्या घरातील टीव्ही , फ्रीज यासह वाहने महापालिका जप्त करणार आहे . कर संकलन विभागाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये १ हजार कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे हे उद्दिष्ट साध्य करत असताना प्रशासनाची दमछाक झाली असल्याने प्रशासनाने टोकाची भूमिका घेतली आहे . त्यामुळे ज्या नागरिकांचा कर कला आहे त्यांच्याकडील जंगम मालमत्तेवर टाच येणार आहे . पिंपरी – चिंचवड शहरात ५ लाख ८२ हजार मिळकतींची नोंद आहे . चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत ४२० कोटी रूपये कराचा भरणा झाला आहे . महापालिकेच्या १७ विभागीय कार्यालयामार्फत कर संकलनाचे कामकाज केले जाते . गतवर्षी कर संकलन विभागाने ६२५ कोटी कर वसूल केला होता . यंदा , कर आकारणी व कर संकलन विभागाने १ हजार कोटी रूपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे . त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

तब्बल ५८३ कोटी रुपयांचा कर थकीत शहरातील तीन लाख निवासी मालमत्ताधारकांकडे तब्बल ५८३ कोटी रुपयांचा थकीत कर आहे . महापालिकेने ज्या निवासी मालमत्ता बंद आहेत , त्या सील करण्याचे धोरण आखले आहे . याची कार्यवाही याच आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे . मात्र , ज्या निवासी मालमत्तांमध्ये नागरिक वास्तव्य करतात , अशा थकबाकीदारांकडे ५० किंवा १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीत थकबाकी आहे . अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार , टीव्ही , फ्रीज व घरातील इतर महागड्या वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *