कंत्राटी कामगार पीएफ, ईएसआय पासून वंचित

०९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


शहरात छोट्या-मोठ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधी ( पीएफ ) , राज्य कामगार विमा योजना ( ईएसआय ) आदी सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम काही कंत्राटदारांच्या माध्यमातून सध्या सर्रास सुरू आहे . त्यांच्यावर कायद्याचा वचक राहिला नसल्याने त्यांचे चांगलेच फावते आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीचे पत्रच न देणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेकदा कंत्राटदार ज्या नोकरीत रुजू करून घेतात , त्याचे पत्रच देत नाहीत . त्यामुळे आपोआपच संबंधित कर्मचारी विविध सुविधांपासून वंचित राहतो . असे पत्र नसल्याने किंवा कामगार राज्य विमा योजनेकडे नोंदणी करून दिले जाणारे ईएसआय कार्ड ( ओळखपत्र ) त्यांच्याकडे नसल्यास त्यांना ‘ ईएसआय ‘ अंतर्गत मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे लागते.

सफाई कामगार , सुरक्षारक्षक , कंत्राटी तत्त्वावर काम करणारे कामगार आदींचा त्यामध्ये समावेश होतो . राज्य कामगार विमा योजनेविषयी राज्य कामगार विमा अधिनियम १ ९ ४८ अंतर्गत कामगारांसाठी राज्य कामगार विमा योजना लागू करण्यात आलेली आहे . राज्यात सप्टेंबर १ ९ ५४ मध्ये प्रथम ही योजना लागू करण्यात आली . दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे . या योजनेत पात्र होण्यासाठी कामगारांची कमाल वेतन मर्यादा ( ज्यादा काम वगळून ) २१ हजार इतकी असायला हवी .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *