पुणे जिल्ह्यातून केवळ सहा टक्के उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण

०८ नोव्हेंबर २०२२

पिपरी


शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली . सप्टेंबर २०२१ मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल २१ ऑक्टोबरला जाहीर झाला . या परीक्षेचा राज्याचा निकाल केवळ चार टक्के इतका लागला तर विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याचा निकाल साधारण सहा टक्क्यांपर्यंत लागला . त्यामुळे गुरुजी तुम्हीच नापास झालात , तर विद्यार्थ्यांचे काय होणार , असा प्रश्न पालकांना पडला आहे.

इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या अनुदानित वर्गांवर शिक्षक म्हणून नियुक्ती होण्यासाठी आता टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे . महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते . गेल्या वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती . मात्र , टीईटी घोटाळ्यामुळे या परीक्षेचा लांबणीवर पडलेला निकाल २१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला . या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरीची हमी नसल्याने काही जणांनी परीक्षेला सामोरे जात असताना सकारात्मकता ठेवली नसल्याने टक्केवारी घसरली असल्याचे तज्ज्ञांने सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *