श्रीलंकन क्रिकेटचा मोठा निर्णय, दानुष्का गुणाथिलकाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून हकालपट्टी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


टी २० विश्वचषक स्पर्धा ऐन रंगतदार स्थितीत असताना क्रिडा विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंका टीमचा विस्फोटक फलंदाज दानुष्का गुणाथिलका याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दानुष्काला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी श्रीलंकेचा संघ धनुष्का शिवाय मायदेशी परतला आहे.

दानुष्का गुणाथिलका याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. दानुष्काच्या अटकेमुळे श्रीलंका क्रिकेटचीही बरीच बदनामी होत आहे, मात्र याच दरम्यान 24 तासांनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत गुणाथिलकाला सर्व फॉरमॅटमधून निलंबित केले आहे. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी याची पुष्टी केली की, देशाच्या क्रिकेट बोर्ड यूएसच्या कार्यकारी समितीने राष्ट्रीय खेळाडू दनुष्का गुनाथिलकाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *