२७ हजार जणांनी केला फुकट प्रवास, भरला कोटीचा दंड

०४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते . त्यामुळे रेल्वे आरक्षण फुल्ल होते. या काळात खासगी ट्रॅव्हल्स बस , तसेच एस.टी. बसचे भाडेवाढ करण्यात येते . त्यामुळे अनेक नागरिक रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात . त्यातही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा फुकट्या २७ हजारांहून अधिक प्रवाशांवर ऑक्टोबरमध्ये पुणे विभागात रेल्वेकडून कारवाई करण्यात आली . या फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी ३० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी पर्यटनासह मूळ गावी जाण्याचे नियोजन केले होते.

दंड वसुलीत २२ टक्क्यांनी वाढ यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत दोन लाख पाच हजार ४०० केसेसमध्ये १४ कोटी ६८ लाख रुपयांचा दंड वसूल केला . चालू आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट सात महिन्यांतच गाठण्यात पुणे रेल्वे विभागाला यश आले. दंड न भरल्यास तुरुंगवास तिकीट तपासणीसाठी नियमित मोहीम सुरू आहे . प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड आकारण्यात येईल , दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *