बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अग्निशामक परवान्याची गरज नाही

०४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवड शहरातील १५ ते २४ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यासाठी अग्निशामक विभागाचा दाखला घेण्याची अट होती . मात्र , केवळ बेसिक नॉन स्ट्रक्चरल फायर सेफ्टी मेजरची पूर्तता केल्याची खात्री करून पूर्णत्वाचा दाखला द्यावा , असा धारेणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे , अशी माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली . अग्निशमनच्या दाखल्याऐवजी बेसिक नॉन स्ट्रक्चरल फायर सेफ्टी मेजरची पूर्तता केल्याची खात्री करून पूर्णत्वाचा दाखला नागरिकांना मिळणार आहे . राज्य शासनाने २०२० मध्ये एकत्रित विकास नियंत्रण नियमावली जारी केली आहे . त्यामध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेचा समावेश आहे.

नियमात केले बदल २४ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक नव्हता . त्याप्रमाणे बांधकाम परवानग्या दिल्या . पुणे महापालिका अग्निशामक विभागाप्रमाणे महापालिका अग्निशामक विभागाने पूर्वीप्रमाणेच १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या निवासीसह सर्व प्रकारच्या इमारती , ५०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाचा मजला अशा विविध मिश्र , वाणिज्य इमारतींना तात्पुरता , सुधारित आणि अंतिम अग्निशामक ना हरकत दाखला देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत . त्या अनुषंगाने बांधकाम परवानगी विभागामार्फत नवीन बदल केले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *