मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता?; सुषमा अंधारे संतापल्या

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


सुषमा अंधारे यांनी भाषेवरून थेट गुलाबराव पाटील यांच्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे काल धरणगावात होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधताना थेट गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीवाले बाबा व्हायचं आहे.

मात्र, धरणगावात २५ दिवस पाणी सुटत नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा हल्ला सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर चढवला. गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात. मी तुमचा हजारवेळा भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल त्यांनी केला.शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील? असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *