मुंबईतील छबीलदास शाळेत एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२
दादरमधील (पश्चिम) छबीलदास शाळेत मोठा स्फोट झाला आहे. या ठिकाणी चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.आज पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत.

चार सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणी आग लागली होती. तर यामध्ये तीन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या भीषण स्फोटामुळे शाळेचा दुसरा मजला उध्वस्त झाला आहे आणि भिंतींनाही तडे गेले आहेत. याशिवाय काचांचे तुकडे परिसरात विखुरलेले आहेत.या घटनेमधील जखमींवर सायन रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. तर सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण पोलीस व अग्निशमन विभागाकडून शोधले जात आहे.