चुकीच्या ईमेल आयडीवर पाठवलेला ईमेल या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ नोव्हेंबर २०२२


महत्वाची माहिती, कागदपत्रे,रिझ्यूम पाठवण्यासाठी ईमेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अनेकद चुकीच्या ईमेल आयडीवर ईमेल गेल्याच्या घटना घडतात. ईमेल अ‍ॅड्रेस टाकताना गडबड झाल्यास असे होते. त्यासाठी पाठवलेला ईमेल परत मिळवून देण्याचा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे.

UNDO फंक्शनचा वापर करून तुम्ही पाठवलेला ईमेल रद्द करू शकता. मात्र यासाठी केवळ ३० सेकंदांचा वेळ मिळतो. तुम्हाला ईमेलमध्ये काही बदल करायचे असल्यास हे फीचर फायदेशीर ठरते.

या स्टेप्स फॉलो करून पाठवलेला ईमेल तुम्ही परत मिळवू शकता –

ईमेल पाठवल्यानंतर लगेच अंडू आणि मेसेज सेंट असे दोन पर्याय येतात. इमेल परत मिळवण्यासाठी तुम्ही अंडू बटनवर क्लिक करा.

अंडू बटनवर क्लिक केल्यानंतर पाठवलेला ईमेल तुम्हाला परत कंपोज मोडमध्ये दिसेल.

ईमेल ड्राफ्टमध्ये देखील जमा होतो. येथून हा ईमेल उघडून तुम्ही तो एडिट करू शकता किंवा योग्य ईमेल आयडीवर पाठवू शकता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *