गुजरातमधील मोरबी झुलता पूल कोसळला, दुर्घटनेतील मृतांचा आकडा 141 वर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
३१ ऑक्टोबर २०२२


गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 141जणांचा मृत्यू झालाय तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे चारशेहून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान पाच दिवसापूर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 लोक उपस्थित होते. यापैकी 400 हून अधिक लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर हा पूल नुकताच पाच दिवसांपूर्वी पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात होता. आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.वायुसेनेच्या जवानांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारने मदतीसाठी 02822-243300 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *