राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत – रोहित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले होते असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. राम शिंदे यांच्या आरोपांना ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकिन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यााठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू . असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *