नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे – जयंत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचुन छोटी छोटी तळे बनली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुणे बदलत असल्याचं बोलल जात आहे. परंतु पुणे शहराच्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *