मीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो – शरद पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (१७ ऑक्टोबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते काँग्रेसमध्ये असताना झालेल्या अशाच एका निवडणुकीची आठवण सांगितली आहे.

शरद पवार म्हणाले, मी काँग्रेसमध्ये असताना बिहारचे नेते सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढलो होतो आणि मी हरलो होतो. तेव्हा सीताराम केसरींना गांधी घराण्याचा पाठिंबा मिळाला होता. तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक झाली नाही.हे चांगलं आहे की, काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पक्षात संघटनात्मक निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात ही जमेची बाजू आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *