माळी समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू वर मेळावा संपन्न

पवन गाडेकर
निवासी संपादक
१७ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले ब्रिगेड,अखिल भारतीय समता परिषद,श्री संत सावता माळी संघ जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, यवतमाळ चे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पंचायत समिती जुन्नर चे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, समता परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष किरण झोडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी दिवंगत शेतकरी नेते लक्ष्मण शिंदे यांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मार्गदर्शन करताना यवतमाळ चे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ
मार्गदर्शन करताना यवतमाळ चे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ

मेळाव्यासाठी तालुक्यातून तसेच, मुंबई, पुणे, नाशिक सह विविध भागातून वधु वर,व पालक उपस्थित होते. जवळपास २५० वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करून त्यांचा परिचय दिला. कार्यक्रमासाठी समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. माळी समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. संघटनेच्या वतीने सामजिक जाणिवेतून केलेल्या मदतीचा आढावा घेऊन कौतुक करत या पुढील काळात देखील सामाजिक कार्यक्रम राबवण्याचं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रम प्रसंगी समाजामधील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सामाजिक जाणीवेतून संघटना व समाजाच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम – 
कोविड काळात ग्रामीण रुग्णालयात ५१ बेड, गादी, वाफेच मशिन याचं वाटप
कोरोना काळात तालुक्यातील गोर गरीब जनतेसाठी शिवभोजन थाळीचं एक महिना मोफत वाटप
विशेष पुरस्कार देऊन कोरोना योद्धा म्हणून तालुक्यात विविध ठिकाणी डॉक्टर व पोलिसांचा सन्मान
सांगली कोल्हापूर मधील पूरग्रस्त बांधवांसाठी धान्य वाटप व जनावरांसाठी चारा वाटप
विशेष पुरस्काराने ह.भ.प सुदाम महाराज बनकर यांना केलं सन्मानित.
सतत १० वर्ष राबविले जातात विविध उपक्रम

काही दिवसांपूर्वी युरोप मध्ये झालेल्या आयर्न मॅन सपर्धेत यश संपादन केल्याबद्दल मंगेश चंद्रचूड कोल्हे, मेडिकल क्षेत्रातील व सामाजिक दातृत्वाबद्दल सुरेश वऱ्हाडी, प्रशासकीय सेवेत पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारी कुमारी तनुजा संपत डोके,युवा उद्योजक संतोष भुजबळ,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मच्छिंद्र शेटे, वृद्धाश्रम स्थापन करून वृद्धांची सेवा करणाऱ्या श्रीमती नंदाताई मंडलिक या सर्वांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तसेच समाजातील विविध गावच्या सरपंचांचा व पत्रकारांचा सन्मान सत्कार करण्यात आला. संघटनांचे पदाधिकारी आत्माराम संते,सचिन वऱ्हाडी,निलेश भुजबळ,दत्ता शिंदे, शिवदास विधाटे, डी एल मस्के, हेमंत कोल्हे,अनिल घोलप,एम डी नाना भुजबळ,संचित कोल्हे,संदीप नाईक, भरत नाईक,जितेंद्र बिडवई,जयवंत डोके,उदय भुजबळ,नितीन भुजबळ, निलेश बनकर,बंडोपंत विधाटे,राजेंद्र गायकवाड,रवींद्र भुजबळ यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला महिला व पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती.

मान्यवरांसोबत सत्कार मूर्ती
मान्यवरांसोबत सत्कार मूर्ती

माजी नगराध्यक्ष अनिल मेहेर,संतोष केदारी,सदाशिव ताम्हाणे, रवींद्र डोके ॲड.हेमंत भास्कर,बी एस कोल्हे,शंकरराव कोल्हे,सोपानराव कोल्हे,समीर मेहेत्रे,राहुल बनकर,शिवदत्त संते,सुनील मेहर,राजेंद्र संते,शरद शिंदे,निवृत्ती नाईक,अविनाश मेहेर,शरद ताजणे, गणपत गडगे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एल म्हस्के यांनी केले सूत्रसंचालन लक्ष्मण मंडलिक व हेमंत कोल्हे यांनी केले,तर आभार रोहिदास डोके यांनी मानले.

मेळाव्यासाठी उपस्थित असलेले समाजबांधव
मेळाव्यासाठी उपस्थित असलेले समाजबांधव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *