आळे येथील शेतकरी अस्मानी अवकाळी पावसाने संकटात

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१५ ऑक्टोबर २०२२

आळेफाटा


सध्या राज्यभर अस्मानी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले विविध रोप संकटात सापडली आहे. शेतकरी अगोदरच बाजारभावाचा अभाव, निर्यातबंदी यामुळे पिडलेला असताना त्यात भर अशी की अस्मानी, अवकाळी पावसाने उभी रोप भुईसपाट केले आहे.

आळे येथील सुरेश हुलवळे यांच्या जवळपास २ एकर क्षेत्रामधील चिवचिव जातीचे वांग्याचे पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामुळे हुलवळे यांच्या सारखे इतर ही शेतकरी ह्या अवकाळी पावसाने उभे पीक आडवे झाल्याने व शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने हवालदिल झाले आहे. शासनामार्फत तात्काळ पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मदतीची याचना करीत आहे.विद्यमान लोकप्रतिनिधी ह्यांनी ठिकठिकाणी नुकसानग्रस्त भागाचे दौरे करून शेतकऱ्यांना अति तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी जनसामान्य लोकमधून शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *