मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहत आहे – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१३ ऑक्टोबर २०२२


उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील संघर्षावर थेट भाष्य केले आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत आहे. दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून न्यायालयात जावे लागले. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या. माझी तयारी आहे. दोघे एकाच व्यासपीठावर एकाच मैदानावर येऊ. मग जी लढाई व्हायची ती होऊ द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली होती. मात्र शरद पवार, काँग्रेस यांच्या रुपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *