प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह; मराठा समाजासाठी चंद्रकांत पाटलांची घोषणा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठाआरक्षण आणि सुविधांसाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आदी सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १५ लाखांपर्यंत व्याज परतावा देणे, आरक्षणाचा लाभ मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असल्यास त्यांना शुल्क परतावा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *