आमचं हिंदुत्व शेंडी, जानव्यांशी जोडलेले नाही, आमच हिंदुत्व देशाशी जोडलेले आहे – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या थडग्यावर जाऊन डोके टेकवणारे पक्षांची औलाद. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, अशा भाषेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस टीका केली आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे आरोप शिंदे-भाजपने केले होते. यावर आज उध्दव ठाकरेंनी उत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपाने आमच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवात आहेत. कोणाच्यातरी थडग्यांवर जाऊन हे थडगे कसे सजवले ते कसे सजवले हे दाखवत आहेत. पण, पाकिस्तानात जाऊन जिनाच्या थडग्यावर जाऊन डोके टेकवणारे पक्षांची औलाद. तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकवायचे. पाकिस्ताच्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. हिंदुत्व हे खणखणीत असले पाहिजे. हिंदुत्वावर बोलताना माझे मत स्पष्ट आहे. सर्व तथाकथित हिंदुत्वावाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे मी माझे वडिलोपर्जित हिंदुत्व सांगतो, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मुळामध्ये तुमचे हिंदुत्व नक्की कशी जोडलेले आहे. बाळासाहेबांनी याच व्यासपीठावर सांगितले की, आमचं हिंदुत्व शेंडी, जानव्यांशी जोडलेले नाही. आमच हिंदुत्व देशाशी जोडलेले आहे. असे तर असेल व्याख्या स्पष्ट आहे. जे म्हणत आहेत बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी हे ऐका. बाळासाहेबांनी अनेकदा म्हणालेत जो माझ्या देशावर प्रेम करतो  तो माझा मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकाने आपल्या धर्म घरात ठेवावा. पण घराबाहेर पडले तर हा देश हाच माझा धर्म ही शिकवण बाळासाहेबांनी दिली आहे. परंतु, घराबाहेर जर कोणी धर्माची मस्ती आमच्यासमोर केली तर त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही