टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकामध्ये भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र बीसीसीआयने क्रिकेटप्रेमींचा हा संभ्रम दूर केला आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला असून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

आता बुमराहनेही आपली प्रतिक्रिया ट्वीट करत दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने भावनिक संदेश लिहित म्हटलं आहे की यावेळेस मी T20 विश्वचषकाचा भाग होणार नाही हे पाहून मी निराश झालो आहे, परंतु माझ्या प्रियजनांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि समर्थनाबद्दल मी आभारी आहे.