विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे; आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


ठाकरे सरकारने कुलगुरू निवडीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून टाकले होते. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय बदला आहे. यावरून आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर ट्विट करत टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले की ,विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता.

ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे

शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले पेग्विन सेनेला चपराक, सरकारचे आभार. ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे. असंही आशिष शेलार ट्विट करत म्हणाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *