मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ सप्टेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली.|

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय –

१. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.

२. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय. दुरुस्तीसह पुन्हा लागू होणार.

३. एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

४. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास ‘बॅ.नाथ पै विमानतळ’ असे नाव देणार.

५. राज्यात फोर्टिफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करण्यात येणार.

६. पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरण्यात येणार.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *