माधव गणपत क्षीरसागर यांचे वृद्धापकाळाने निधन

१६ सप्टेंबर २०२२
नारायणगाव


नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील कापड व्यावसायिक माधवराव गणपत क्षीरसागर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. नारायणगाव येथील कापड व्यावसायिक बाळासाहेब क्षीरसागर व भोला क्षीरसागर यांचे ते वडील होत. अतिशय शांत व संयमी स्वभाव असणाऱ्या माधव गणपत शिरसागर यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. श्री हरीस्वामी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व कापड व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून माधव गणपत क्षीरसागर हे कार्यरत होते. विशेष म्हणजे माधव गणपत क्षीरसागर यांचा आज वाढदिवस होता. बरोबर ९४ वर्षांपूर्वी ते १५ सप्टेंबर १९२८ रोजी आजच्या दिवशीच जन्मले होते. ज्याच दिवशी वाढदिवस त्याच दिवशी मृत्यू असा योग क्षीरसागर यांच्या जीवनात आला. आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *