पोलीस उपायुक्तांचे कारवाईचे आश्वासन , अपना वतन संघटनेचे ” हल्लाबोल ” आंदोलन स्थगित

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ सप्टेंबर २०२२

चिंचवड


तरुणाला मारहाण करणाऱ्या सांगवी पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस . बी कदम यांना निलंबित करा या मागणीसाठी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी ३. ०० वाजता पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या कार्यालयावर ” हल्लाबोल ” आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करा , पिडीताला न्याय मिळालाच पाहिजे , इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता . यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गणेश कांची या तरुणाला अश्लील शिवीगाळ करीत, बंदुकीचा धाक दाखवत, बेल्टचा दांड्याने अमानुष मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन सांगवी पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेशिस्त वर्तवणूक व कर्तव्यात कसूर करून बेजबाबदार पणा दाखवलेला आहे. त्याबद्दल अनेकवेळा मा. पोलीस आयुक्त , पिंपरी चिचंवड , पोलीस उपायुक्त परिमंडळ २ , सहाय्यक पोलीस आयुक्त , वाकड विभाग व सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु तरीसुद्धा आज २ महिने होऊन गेले तरी सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक एस . बी . कदम यांचेवर कारवाई न झाल्याने पोलीस दलामध्ये चुकीच्या प्रवृत्तींना अभय दिल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय व अत्याचारची प्रकरणे घडू शकतात . त्यामुळे पोलीस आयुक्त खाकी वर्दीतील मुजोर अधिकाऱ्यांवर ” अंकुश ” ठेवणार का असा सवाल केला . यानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगवी पोलीस स्टेशन मधील या गंभीर प्रकारची दखल घेतली असून काही त्रुटी पूर्ण करून दोन दिवसात संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पीडित काची परिवार उपस्थित होते.
सदर आंदोलनामध्ये अपना वतनचे सचिव दिलीप गायकवाड , कार्याध्यक्ष हमीद शेख , शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा , महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर , मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू साळवे , रयत विद्यर्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे , रविराज काळे , तौफिक पठाण ,फातिमा अन्सारी , प्रकाश पठारे , अतिक आतार ,अमर माने , जया आचार्य , कुसुम गायकवाड , दीपक खैरनार ,सालार शेख ,इमाम नदाफ ,अल्ताफ शेख , नीरज कडू , राहुल चौधरी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *