महाराष्ट्रात मोदींचं नाही बाळासाहेबांचं नाव चालतं

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२५ ऑगस्ट २०२२


आगामी महापालिका निवणुकांमध्ये मुंबईवर भाजपचा डोळा आहे. पण भाजपला माहिती नाही, महाराष्ट्रात, मुंबई मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव चालतं… शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला ठणकावून सांगितलं. मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कामगारांना संबोधित करताना मुद्दाम काही गोष्टींवर भर दिला. कामगारंनो, तुम्ही मुंबईतल्या लाखो घरांमध्ये जाऊन दिवे लावतात. त्यामुळे सध्या जो काळा बाजार सुरु आहे, त्याविषयी लोकांच्या घरात प्रकाश टाका, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

भाजपचे लोक सध्या आमदार, खासदार, एवढंच काय तर शिवसेनेची, बाळासाहेबांची स्वप्नही चोरतायत. हा पक्ष आहे की चोरबाजार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केला. तसेच एकनाथ शिंदे सरकारवर खोक्यांवर जी टीका होतेय, त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात खिल्ली उडवली.एकनाथ शिंदे सरकारवर खोके घेऊन आलेलं सरकार अशी टीका होतेय. उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा कार्यक्रमात उचलून धरला. मी काहीच बोलत नाहीये तर जनता बोलतेय, हे सांगताना ते म्हणाले, ‘ सध्या 50 खोके एकदम ओके अशी घोषणा व्हायरल होतेय. लोकं चिडवतायत. तुम्ही लोकं घरोघरी जाऊन दिवे लावता, तसे या काळ्या करभारावरही प्रकाश टाकला पाहिजे. हे खोकं सरकार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही कोट्यवधींची कामं केली. कागदोपत्री असलेली कामं प्रत्यक्षात आणली. पण या सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली. कारण यांचा जन्मच खोक्यातून झालाय…भाजपच्या जिव्हारी लागणारं आणखी एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठीच भाजपचं राजकारण सुरु आहे.

दुसऱ्या पक्षातून आमदार, खासदार एवढंच काय तर स्वप्नही चोरायचे… त्यामुळे हा पक्ष आहे की चोरबाजार, असा प्रश्न पडतो…महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचे भाजपचे मनसुबे असले तरीही हे शक्य नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात ठणकावून सांगितलं. ते म्हणाले, भाजपबरोबर 25 वर्ष युतीत सडली. शिवसेना बाहेर पडली तरीही ते थांबलेले नाहीत. महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुणीही मतं देत नाहीत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *