शर्मिला ठाकरे आहेत नवरा आणि मुलावर लक्ष ठेवून पहा किस्सा

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२२ ऑगस्ट २०२२


राज्यात सत्तांतर घडत होत त्यावेळी राज ठाकरे किंवा मनसेकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही यावर शर्मिला ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष होतच राजकीय टीकाटिप्पणी करणार नसल्याचे सुरुवातीलाच शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट केले. मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे हे नाही, तर माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे, याच्यावर मी लक्ष ठेवून असते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शिवसेनेवर त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर मंत्रिमंडळात महिलांना स्थान असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे ऐकले आहे. त्यावेळी नक्की महिलांना स्थान मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडे चांगल्या महिला आहेत. पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवनसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर विचारणा केली असता, त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून फुटल्यानंतर तसेच शिंदे फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी जे पत्र लिहिले होते, त्यात या नेत्यांचे कौतुकही केले होते. दरम्यान, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहे. शिवसंवाद यात्रा काढत आहेत, त्याबद्दल विचारले असता, हे चांगले आहे, शुभेच्छा त्यांना, असे त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *